राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे दिनांक 25 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये होणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन 25.03.2022 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास श्री. बंडा कुंभार, तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय दोन वर्षानंतर सुरू झाले. याच धर्तीवर “आरोग्य हीच खरी संपत्ती” या शीर्षकावर आधारित शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार भोईटे होते.