राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषी अर्थशास्त्र विभागामार्फत दिनांक २ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘शेतीपूरक व्यवसायातून महिलांचे सबलीकरण’ या विषयाचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती स्नेहा पोवार, कृषि अधिकारी, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालय, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. उत्तमराव होले, सहयोगी अधिष्ठाता, रा. छ. शा. म. कृषि महाविद्यालय, कोल्हापूर यांनी भूषविले. या वेळी डॉ. आर. आर. सूर्यवंशी, सहयोगी अधिष्ठाता, कृ. म. कराड, डॉ. एस. एस. कांबळे, समन्वयक, अनुसूचित जाती सहाय्य योजना आणि डॉ. बी. टी. कोलगणे, प्राध्यापक, कृषि विस्तार शिक्षण विभाग हे प्रमुख उपस्थित होते. प्रा. ए. एन. रत्नपारखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.