शिवजयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे मशाल व शिवरायांची मूर्तीची मिरवणूक विद्यार्थी परिषद प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आयोजित केली होती. त्यामध्ये सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, डॉ. शैलेंद्र कांबळे, उपाध्यक्ष, विद्यार्थी परिषद, प्रा. अजय देशपांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी, डॉ. संग्राम धुमाळ, कुलमंत्री, डॉ. जगदीश पाटील, डॉ. सुनिता वाघमारे, श्रीमती. मीनाक्षी पाटील ई. उपकुलमंत्री यांनी उपस्थित राहून मिरवणूक व्यवस्थापन केले.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. उदयकुमार मोरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांचे हस्ते शिवमूर्ती आणि मशाल पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. अजय देशपांडे यांनी करून दिली. सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला.
यानंतर श्री. उदयकुमार मोरे यांनी
सह्याद्रीच्या कुशीत हवा, शिवरायांचा जन्म नवा याविषयावर सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साताप्पा खरबडे, यांनी अध्यक्षीय भाषण केले.
डॉ. मनीषा मोटे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि पोवाडा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॉ. खरबडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.